आम्ही खुल्या प्रवर्गातले आहोत कृपया आमच्याकडे मते मागू नका

आम्ही खुल्या प्रवर्गातले आहोत कृपया आमच्याकडे मते मागू नका

मध्यप्रदेशच्या घराबाहेर लावलेल्या पाट्या

मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २८ नोव्हेंबरला मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकींसाठी कंबर कसली असून मतदार संघामध्ये मतदारांच्या भेटीगाठीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोपालमधील काही घरांवर आमच्याकडे मते मागू नका अशा पाट्या लावण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. ‘आम्ही खुल्या प्रवर्गातले आहोत, त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने आमच्याकडे मते मागू नये’ असा थेट मजकूर या पाट्यांवर लिहण्यात आला आहे.

आमचे मत थेट नोटासाठी

भोपालमधल्या भरत नगर सवर्ण सिमितीने आपल्या घरांच्या गेटवर लावलेल्या पाट्या सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चक्क त्यांनी ‘आम्ही खुल्या प्रवर्गातून आहोत. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने आमच्याकडे मते मागायला येऊ नये’ असे या फलवार लिहिले आहे. ऐवढेच नाही तर आमचे मत थेट नोटासाठी असणार आहे, असे देखील या पाट्यांवर लिहिण्यात आले आहे.

एससी आणि एसटीचे आरक्षण रद्द करा

भरतनगरमधील नागरिकांनी एससी आणि एसटी प्रवर्गातील आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. या आरक्षणाचा खुल्या प्रवर्गातील नागरिकांवर मोठा परिमाण होतो, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळेच आम्ही या निवडणुकीत त्यांनी हा निर्णय घेतला असून यंदा ते नोटाला मत देणार असल्याचे सांगितले आहे.

First Published on: October 14, 2018 5:54 PM
Exit mobile version