‘I feel better now, लवकरच कोरोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन’ – ट्रम्प

‘I feel better now, लवकरच कोरोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन’ – ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र आपली प्रकृती उत्तम असल्याचे सांगत लवकरच कोरोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन, असे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. तसेच त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. मला परत यावंच लागेल कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचं आहे. आम्हाला यूएसएला महान बनवायचं आहे त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. एकत्र येऊन काम करा आणि ते पूर्ण करा, असे ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे.

मला बरं वाटावं म्हणून वॉल्टर रिड मेडिकल सेंटरचे डॉक्टर्स, नर्सेस हे प्रचंड मेहनत घेत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या सगळ्यांचं कार्य पाहून मी थक्क झालोय. मागील सहा महिन्यात ज्या ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अमेरिका ही एक महासत्ता आहे. जगात अमेरिकेचा दबदबा आहे या अमेरिकेसाठी मी लवकरच कोरोनामुक्त होऊन परत येईन असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.

तसेच, ‘मी सर्वांचे आभार मानतो, मी वॉटर रीड हॉस्पिटलला चाललो आहे. मला वाटतं मी ठीक आहे मात्र सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात म्हणून मी दवाखान्यात दाखल होतोय. फर्स्ट लेडी देखील ठीक आहेत. मी सर्वांचे पुन्हा आभार मानतो, हे प्रेम कधीही विसरणार नाही.’ असेही त्यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

कोरोनाची लागण झाल्याची स्वतः दिली माहिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ट्रम्प यांनीच आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.


Covid-19 in US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया पॉझिटिव्ह
First Published on: October 4, 2020 10:44 AM
Exit mobile version