बेपत्ता एएन – ३२ विमान अपघात प्रकरण; १३ जणांचे मृतदेह आणि अवशेष सापडले

बेपत्ता एएन – ३२ विमान अपघात प्रकरण; १३ जणांचे मृतदेह आणि अवशेष सापडले

बेपत्ता एएन – ३२ विमान अपघात प्रकरण

अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यामध्ये भारतीय वायुदलाचे दुर्घटनाग्रस्त एएन ३२ विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व १३ जवानांचा मृत्यू झाला होता. या १३ जणांमधील सहा जणांचे मृतदेह तर ७ जणांच्या मृतदेहांचे काही भाग सापडल्याची माहिती समोर आली आहे. खराब वातावरणामुळे त्यांचा शोध घेण्यास अडथळे येत होते. तसेच अनेकदा शोधमोहिम थांबवण्यातही आली होती. दरम्यान, शोध पथकात वायुसेना, लष्कराच्या जवानांसह गिर्यारोहकांचा देखील समावेश होता.

असा घडला अपघात

आसाममधून हवाई दलाचे एएन ३२ मालवाहतूक विमान सोमवारी ३ जून रोजी दुपारी बेपत्ता झाले. हे विमान दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. परंतु १ वाजण्याच्या सुमारास या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या मालवाहू विमानानाचा हवाई दलाने शोध सर्वत्र सुरू केला, मात्र अद्याप शोध लागला नाही. ज्यामध्ये आठ क्रू मेंबरचा समावेश होता. हे विमान अरूणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते. दुर्घटना घडलेले ठिकाण अत्यंत उंचावर आणि घनदाट जगंलात असल्याने विमानाच्या अवशेषांजवळ पोहचणे आव्हानात्मक होते.

यांचा होता अपघातामध्ये समावेश

या अपघातात विंग कमांडर जी एम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस. मोहंती, फ्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, सार्जेंट अनूप कुमार, कोरपोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस. के. सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, कर्मचारी पुताली आणि राजेश कुमार यांचा अपघातामधील मृतांमध्ये समावेश असल्याचे भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आले होते.


हेही वाचा – भारतीय हवाई दलाचे ‘एएन-३२’ची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशात सापडले बेपत्ता ‘एएन – ३२’ विमानाचे अवशेष


First Published on: June 20, 2019 2:20 PM
Exit mobile version