‘ओटीपी’ घेऊन IAS अधिकाऱ्याला घातली १ लाखांची ‘टोपी’

‘ओटीपी’ घेऊन IAS अधिकाऱ्याला घातली १ लाखांची ‘टोपी’

सायबर क्राइम

वरिष्ठ IAS अधिकाऱ्याला १ लाखांचा गंडा घातला गेल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. वाहतूक आणि दळणवळण विभागाचे प्रमुख सचिव बसवराजू यांना हा १ लाखाचा गंडा घातला गेला आहे. याप्रकरणी बसवराजू यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. १९ नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. १९ नोव्हेंबरला बसवराजू यांना एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. यावेळी त्यानं आपलं नाव संतोष सुब्रह्मम्हणीया असून स्टेट बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याची बतावणी केली. तसंच त्यानं यावेळी डेबिट कार्डची काही माहिती देखील विचारली. यानंतर त्यानं डेबिट कार्ड लवकरच एक्सपायर होणार असून त्याचं रिन्यूव्हेशन करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. त्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा असं त्यानं सांगितलं. बसवराजू यांनी देखील लगेच ओटीपी सांगितला देखील. पण, त्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरानं त्यांच्या खात्यातून १ लाख रूपये काढल्याचा मेसेज बसवराजू यांना आला. यानंतर बसवराजू यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

First Published on: December 5, 2018 4:02 PM
Exit mobile version