CoronaVirus: देशात ३५ खासगी लॅब्सला करोना चाचणीची परवानगी, मुंबईत ५, महाराष्ट्रात ९ लॅब्ज

CoronaVirus: देशात ३५ खासगी लॅब्सला करोना चाचणीची परवानगी, मुंबईत ५, महाराष्ट्रात ९ लॅब्ज

कोरोना टेस्टिंग किट

देशातली करोना बाधितांचा आकडा ७०० पार झालेला असताना आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्स अर्थात ICMRने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आत्तापर्यंत फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच असलेली करोना चाचणीची सोय देशभरातल्या एकूण ३५ खासगी लॅब्सला देण्यात आली आहे. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये या लॅब्स विखुरलेल्या असून त्यातल्या सर्वाधिक ९ लॅब महाराष्ट्रात आहेत. यातल्या ५ लॅब्स मुंबईत, १ लॅब पुण्यात तर १ लॅब ठाण्यात आहे. या लॅब्सची यादी जारी करण्यात आली असून त्यासंदर्भात झीन्यूजने वृत्तांत दिला आहे. त्यामुळे आता करोनाची चाचणी करण्याचा सरकारी सेवेवर येणारा ताण काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या १२७ वर गेलेल्या महाराष्ट्रात सर्वाधित ९ लॅब्सला परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त राज्यात औरंगाबादमधल्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटललमध्ये करोनाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या ३० मार्चपासून ही सुविधा कार्यरत होईल, असं पीटीआयच्या हवाल्याने या वृत्तात म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील परवानगी मिळालेल्या ९ लॅब्स

१) सबअर्बन डायग्नोस्टिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी पश्चिम, मुंबई

२) मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, कोहिनूर मॉल, मुंबई

३) एसआरएल लिमिटेड, प्राईम स्क्वेअर बिल्डींग, गोरेगाव, मुंबई

४) कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबोरेटरी, फोर बंगलो, मुंबई

५) आयजेनेटिक डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी ईस्ट, मुंबई

१) इनफेक्सएन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम

१) थायरोकेअर टेक्नोलॉजीज लिमिटेड, तुर्भे एमआयडीसी, नवी मुंबई

२) सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, रबाळे, नवी मुंबई

१) ए. जी. डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, नयनतारा बिल्डींग, पुणे

महाराष्ट्रातील या ९ लॅब्सशिवाय दिल्लीत ९, गुजरातमध्ये ४, हरयाणामध्ये ३, कर्नाटकमध्ये २, ओरिसामध्ये १, तमिळनाडूमध्ये ४, तेलंगणामध्ये ५ तर पश्चिम बंगालमध्ये एका लॅबला करोना व्हायरसची चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


Coronavirus Live Update: जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ५ लाखांहून अधिक!
First Published on: March 27, 2020 8:58 AM
Exit mobile version