हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर आता ‘हे’ लोक देखील करु शकतात

हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर आता ‘हे’ लोक देखील करु शकतात

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आता 'हे' लोक देखील वापरू शकतात

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च, आयसीएमआर तथा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) च्या वापराबाबत सुधारित आदेश जारी केला आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन फक्त मोजक्याच लोकांना घ्यायला परवानगी होती. मात्र, आयसीएमआरने यात बदल केला असून कोविड-१९ रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या असंख्य आरोग्य कर्मचार्‍यांनाही आता हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेता येणार आहे. सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा प्रतिबंधक औषध म्हणून वापर करण्याची शिफारस केली आहे. सरकारच्या सुधारित सल्ल्यात कोविड-१९ रुग्णालयांमध्ये काम करणार्‍या एसीम्प्टोमॅटिक हेल्थकेअर, कंटेनमेंट झोनमध्ये पाळत ठेवणारे फ्रंटलाइन कामगार, पोलिस आणि निमलष्करी दल हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर करु शकतात.


हेही वाचा – देशात गेल्या २४ तासांत ६,६५४ नव्या रुग्णांची नोंद; १३७ जणांचा मृत्यू


आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त पर्यवेक्षक गट आणि एम्स, आयसीएमआर, राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण केंद्र, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, WHOचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांचे तज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियाच्या उपचारात वापरले जाणारे औषध आहे. कोरोना रोखण्यासाठी भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांना यापूर्वी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरण्याची परवानगी देण्यात आली होती आणि आता सरकारने त्या वापराची व्याप्ती वाढविली आहे. वास्तविक, कोरोना विषाणूची कोणतीही लस किंवा औषध अद्याप सापडलेलं नाही. अशा परिस्थितीत वैकल्पिक औषधांच्या वापराने रुग्ण बरे होत आहेत. हेल्थकेयर कर्मचार्‍यांनाही संक्रमण रोखण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

First Published on: May 23, 2020 11:22 AM
Exit mobile version