या जुळ्या मुलींना करायचे आहे एकाच मुलाशी लग्न

या जुळ्या मुलींना करायचे आहे एकाच मुलाशी लग्न

अॅना आणि लुसी द सिन्क बहिणी (फोटो सौजन्य-डेली मेल)

प्रेमसंबध हे विविध प्रकारचे असतात. बदलत्या वेळे प्रमाणे प्रेमाची भाषा ही बदली आहे. प्रेमसंबधांमध्ये कही वयाचे खूप अंतर असते तर कधी मानव व्यतिरीक्त इतर गोष्टींवर प्रेम करणारे लोक आपल्या आढळून येतात. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये जुळ्या बहिणींनी एकाच माणसाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अॅना आणि लुसी द सिन्क (३३) असे या जुळ्या बहिणींचे नाव आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात या दोघी राहात आहेत. २०१२ पासून या तिघांमध्ये प्रेमसंबध आहेत. ऑस्ट्रेलियन विवाह कायदा १९६१ प्रमाणे बहूपत्नीकत्वाला मान्यता नसल्यामुळे यांना लग्न करता येत नाही. एका टीव्ही शो दरम्यान त्यांनी यामुलाशी लग्नाची इच्छा जाहीर केली आहे. याच बरोबर कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

समांतर दिसण्यासाठी केली प्लास्टिक सर्जरी

अॅना आणि लुसी जुळ्या बहिणी असल्या तरी त्यांनी समांतर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आहे. या प्लास्टिक सर्जरीसाठी त्यांनी तब्बल २.५ लाख डॉलर्स खर्च केले आहेत. मात्र आता त्यांना प्लास्टिक सर्जरी केल्याचा पश्चाताप होतो आहे. त्यांना प्लास्टिक लूक आवडत नसल्याचे त्यांनी शो दरम्यान सांगितले.

आम्ही पॅकेजमध्ये येतो

आज काल सर्वाच गोष्टींसाठी पॅकेज तयार करण्यात आली आहे. एक घ्या दुसरा मोफत अशा प्रकारच्या ऑफर्स मिळत असतात. या दोघींनी लग्नासाठी या सारखाच पॅकेजची घोषणा केली आहे. एकीशी लग्न केल्यावर दुसरीशी लग्न फ्री अशा प्रकारची वेगळीच ऑफर यांनी आपल्या बॉयफ्रेंडला दिली आहे.

First Published on: December 27, 2018 9:57 AM
Exit mobile version