विंग कमांडरला इजा पोहचली तर गंभीर कारवाई करु

विंग कमांडरला इजा पोहचली तर गंभीर कारवाई करु

विंग कमांडरला इजा पोहचली तर गंभीर कारवाई करू

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या परीक्षण तळांवर भारतीय वायुसेनेने १००० किलोच्या इस्रायली स्पाईस बॉम्बने निशाणा साधला होता. त्यामध्ये २०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानचे विमान भारताच्या हाद्दीत येत असताना भारताच्या विंग कमांडर यांनी मिग-२१ या विमानांनी हवेत झेप घेतली. त्यानंतर आकाशातच विमानांमध्ये चकमक सुरू झाली. त्या चकमकीमध्ये पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान विंग कमांडर अभिनंदन यांनी ८६ सेकंदातच नष्ट केले. त्यामध्येच विंग कमांडर यांचेही विमान कोसळले. मात्र, विंग कमांडर अभिनंदन हे त्यातून वाचले. पण ते पॅराशूटने खाली उतरत असताना वाऱ्याच्या झोताने अभिनंदन यांचे पॅराशूट पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. त्यामुळे अभिनंदन पाकिस्तानमध्ये कैद झाले. मात्र त्याच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय दबावामुळे अभिनंदन यांना २ दिवसांत सोडणे पाकिस्तानला भाग पडले. त्यांच्या कैदेच्या वेळी भारतीय वैमानिकाला इजा पोहोचल्यास आक्रमक पावले उचलली जातील अशी धमकी सुद्धा पाकिस्तानला देण्यात आली होती.

पाकिस्तानला दिली धमकी

दरम्याम, विंग कमांडर अभिनंदन हे २७ फेब्रुवारी भारत-पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताची गुप्तचर यंत्रणा, रॉ चे प्रमुख अनिल धस्माना यांनी आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्याशी संपर्क साधला. भारतीय वैमानिकाला इजा पोहोचल्यास आक्रमक पावले उचलली जातील अशी धमकी त्यांनी असीम मुनीर यांना दिली होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानने एकमेकांवर क्षेपणास्त्र टाकण्याची तयारी केली होती, असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. राजस्थानमध्ये भारताने छोट्या पल्ल्याची जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या १२ क्षेपणास्त्रांची तैनाती केली होती. तसेच अभिनंदन वर्थमान यांना शारीरीक इजा पोहोचवली तर हे भारत अजिबात सहन करणार नाही असे डोवाल यांनी बोलटॉन आणि पॉम्पिओ यांना स्पष्ट केले होते.

प्रत्युत्तरची तयारी

प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानने ही भारतातील १३ लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारी त्यांनी केली होती. २७ फेब्रुवारीला हल्ला होणार यासाठी पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीमधील लष्करी तळ, रहिवाशी वसाहतींमध्ये पूर्णपणे काळोख करण्याचे आदेश दिले होते. लाहोरमधील असकारी हाऊसिंग सोसायटी आणि कराचीमधील मालीर कॅन्टॉनमेंटमधील लोकांनी ही माहिती दिली होती. अण्वस्त्राबद्दल सांगता येत नाही. पण विंग कमांडर अभिनंदन यांना काही इजा पोहोचल्यास कारवाई करण्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले होते.

First Published on: March 23, 2019 3:35 PM
Exit mobile version