खोकल्याच्या आवाजावरुन ओळखता येणार कोरोनाचा रुग्ण

खोकल्याच्या आवाजावरुन ओळखता येणार कोरोनाचा रुग्ण

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूची ओळख पटवण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेक पद्धती अवलंबल्या आहेत. पीसीआर चाचणी करत आहे. रुग्णांची विविध प्रकारे तपासणी केली जात आहे. यात मोठा धोकाही आहे की या तपासणी दरम्यान वैद्यकीय कर्मचारीही संक्रमित होत आहेत. आता आपल्या देशातील शास्त्रज्ञ यावर एक चांगला तोडगा आणत आहेत. बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) चे शास्त्रज्ञ श्वास आणि खोकल्यामुळे उद्भवणाऱ्या ध्वनी लहरींपासून कोरोनाची तपासणी करण्यासाठी एक उपकरण तयार करत आहेत.


हेही वाचा – कोरोनाच्या संकटात ‘या’ देशात पार पडल्या निवडणुका; सत्ताधारी पक्षाला मिळालं बहुमत


या उपकरणाच्या मंजुरीनंतर, कोरोना रूग्णांची तपासणी केली जाईल. या उपकरणाच्या मदतीने, आरोग्य कर्मचाऱ्यांना संक्रमणाचा धोका कमी होईल. इतकेच नाही तर या चाचणीचे निकालही लवकर मिळतील. वैज्ञानिक तपासणीसाठी बायोमार्करचे प्रमाण निश्चित करावे लागेल. जेवढ्या लवकर बायोमार्कर निश्चित होईल, तसं आजारी माणसाचा खोकला आणि श्वासाचा आवाज सामान्य आणि निरोगी व्यक्तीपेक्षा किती वेगळा आहे हे जाणून घेणे शक्य होईल. या टीममध्ये ८ वैज्ञानिक आहेत जे व्हॉईस बेस्ड तंत्रज्ञान तयार करत आहेत. आयआयएससी वैज्ञानिक म्हणतात की कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, हे सोपे, किफायतशीर आणि वेगवान तपासणी अत्यंत महत्वाचं आहे. या रोगाच्या मुख्य लक्षणांमध्ये श्वसनाचा समावेश आहे.

 

First Published on: April 16, 2020 3:25 PM
Exit mobile version