मेघालयामध्ये पूर, १३ कामगार खाणीत अडकल्याची भीती

मेघालयामध्ये पूर, १३ कामगार खाणीत अडकल्याची भीती

प्रातिनिधिक फोटो

मेघालयमध्ये सध्या अवैध खाण व्यवसाय जोरात सुरू असल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. पण, यामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ होतोय. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. मेघालयमधील नदीला पूर आल्यानं १३ कामगार अवैधरित्या सुरू असलेल्या खाणीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणताही माहिती मिळत नाही आहे. शिवाय, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद देखील साधता येत नाही आहे. विनापरवाना हा खाण व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. राष्ट्रीय हरित लवादानं २०१४ सालापासून मेघालयमधील काही खाणींवरती बंदी घातलेली आहे. त्यानंतर देखील नियम धाब्यावर बसवून कामगारांच्या जीवाशी खेळून खाण व्यवसाय सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून हे कामगार खाणीमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाबद्दल आता भीती देखील व्यक्त केली जात आहे. अशी दुर्घटना यापूर्वी देखील घडलेली आहे. त्यानंतर देखील नियमांचं पालन होताना दिसत नाही. दरम्यान, कामगारांच्या बजावासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

२०१२ साली झालेल्या दुर्घटनेमध्ये देखील १५ खाण कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. पण, त्यांचे मृतदेह मात्र काही हाती लागले नव्हते.

First Published on: December 14, 2018 10:05 AM
Exit mobile version