वसिम अक्रमच्या लैंगिक अत्याचाराचा कित्ता पूर्वपत्नीने केला उघड

वसिम अक्रमच्या लैंगिक अत्याचाराचा कित्ता पूर्वपत्नीने केला उघड

इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रेहम खान

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि तेहरिक-ए- इन्साफ या राजकीय पक्षाचेनेते इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी ‘रेहम खान’यांच्या आत्मचरित्रात क्रिकेटर, नेते आणि उद्योगपतींबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अक्रम हा स्वत:च्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवंगत पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडायचा असा आरोप रेहम खान कडून केला जातोय. रेहम यांना पाच जणांकडून ही नोटीस बजावण्यात आली असून यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिम अक्रमचाही समावेश आहे. रेहमच्या आगामी पुस्तकाचा काही भाग उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

बदनामी केल्याचा दावा
रेहमचे पहिले पती डॉ. इजाज रेहमान, क्रिकेटपटू वसीम अक्रम, ब्रिटिश उद्योजक सय्यद जुल्फिकार बुखारी, पूर्व क्रिकेटपटू इम्रान खान आणि पीटीआय मीडियाचे समन्वयक अनिल ख्वाजा यांनी रेहमला नोटीसा बजावल्या आहेत. रेहम यांच्या आत्मचरित्रात तिने बदनामी केल्याचा दावा या नोटीसमधून करण्यात आला.

‘लंडन लॉ फर्म’कडून बजावण्यात आली नोटीस
रेहमच्या आगामी आत्मचरित्र्यात तिने विविध ख्यातनाम लोकांशी असलेल्या लैंगिक संबधाबाबत लिहिले आहे. रेहमच्या नावे ३० मे रोजी ‘लंडन लॉ फर्म’कडून डॉ. रेहमान, अक्रम, बुखारी आणि ख्वाजा यांच्या वतीने ‘प्री-एक्शन डिफमेशन प्रोटोकॉल’ जारी करण्यात आले. यामध्ये आमच्या अशीला बाबत ‘चुकीचे, अयोग्य, अत्यंत दिशाभूल करणारे, अशिष्ट, तिरस्करणीय, उपद्रवी, प्रतिमेला हानिकारक, अब्रुनुकसानी आणि बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

काय आहे आक्षेपार्ह
रेहमने लिहिलेल्या पुस्तकात ४०२ आणि ५७२ पानांवर अक्रमबाबत आरोप केले आहेत. अक्रम हा स्वत:च्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवंगत पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले होते. तर ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे उद्योजक सय्यद झुल्फीकार बुखारी यांनी इम्रान खानमुळे गर्भवती झालेल्या एका तरुणीचा गर्भपात करण्यास मदत केल्याचा दावा पान क्रमांक ४६४ वर करण्यात आला. पान क्रमांक ५ वर तीने आपल्या पहिल्या पती डॉ. इजाज रेहमानला क्षुद्र आणि क्रुर म्हटले आहे.

१४ दिवसांमध्ये जवाब द्या
या नोटीसी अंतर्गत रेहमला जाब पुढील १४ दिवसांमध्ये द्यावा लागणार आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध करु नये आणि पुस्तकातून बदनामीकारक परिच्छेद काढून टाकण्याचे आदेशही या नोटीसद्वारे देण्यात आले आहेत.

First Published on: June 7, 2018 2:31 PM
Exit mobile version