अमेरिकेत प्रेतांचा खच; एका दिवसात १ हजार जणांचा मृत्यू

अमेरिकेत प्रेतांचा खच; एका दिवसात १ हजार जणांचा मृत्यू

अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोना विषाणूने १ हजार ४९ जणांचा मत्यू झाला आहे. ही संख्या चीन, इटली आणि स्पेनपेक्षा जास्त आहे. त्याच बरोबर, न्यूयॉर्कमधील रुग्णालयांचे शवविच्छेदन दर अडीच ते सहा मिनिटांनी मृत्यूमुळे भरून जात आहे. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत ५ हजार ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी २६ हजार ४७३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख १५ हजार ३४४ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा ५ हजार ११२ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अमेरिकेच्या वैद्यकिय सेवेवर परिणाम होत आहे.


हेही वाचा – लॉकडाउन मोडलंत, तर शूट अॅट साईट; ‘या’ देशानं काढलं फर्मान


देशभरात वाढत्या मृत्यूची संख्या पाहता मृतदेहांच्या अंत्यसंस्कार करणे कठीण झाले आहे. न्यूयॉर्कमध्ये ही परिस्थिती आणखी बिकट आहे. जिथे गेल्या ३० वर्षांपासून मृतदेह दफन करण्याचे काम करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंत्यसंस्कार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेर्मो यांनी सांगितले की मृतदेह त्यांना हाताळण्यास कठीण जात आहेत. ते म्हणाले, रुग्णालयांचे शवगृह जवळजवळ पूर्ण झाले आहेत, तर या मृतदेहांचे दफन करणे देखील धोकादायक ठरत आहे. मला माहित नाही की मी किती मृतदेह घेऊ शकतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी साथीला प्लेग म्हटलं आहे आणि ते म्हणाले, “प्रत्येक अमेरिकन नागरिकाने येणाऱ्या कठीण काळासाठी तयार राहावे असं माझं आवाहन आहे.”

कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटर, वैद्यकीय साहित्य व इतर वैयक्तिक संरक्षण उपकरणे रशियाकडून खरेदी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. संपूर्ण अमेरिकेत रुग्णालयांना व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांच्यात ३० मार्च रोजी फोनवर चर्चा झाली. त्यानंतर रशियाकडून वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याचा हा निर्णय घेतला आहे.

 

First Published on: April 2, 2020 2:28 PM
Exit mobile version