विमान प्रवासादरम्यान मोबाईलसेवा वापरु शकतील प्रवासी

विमान प्रवासादरम्यान मोबाईलसेवा वापरु शकतील प्रवासी

प्रातिनिधिक फोटो

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना मोबाईल वापरता येत नाहीत. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र आता विमान प्रवासादरम्यानही मोबाईलसेवा वापरता येणार आहेत. या सेवे साठी प्रवाशांना अधिक रुपये मोजावे लागणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ७०० ते १००० रुपये अधिक प्रवाशांना मोजावे लागणार आहे. फक्त मोबाईल सेवानव्हेच तर प्रवाशांना इंटरनेटही वापरता येणार आहे. प्रवासादरम्यान मोबाईल सेवा सुरु करण्यासाठी एक विशिष्ट उपग्रहाची मदत घेतली जाणार आहे. विमानात मोबाईलचे नेटवर्क येत नसल्यामुळे अगोदर ही सेवा विमानात उपलब्ध नव्हती. म्हणून येत्या काळात प्रवाशांना ही सेवा वापरता येणार आहे. मात्र इतर देशांच्या तुलने हा खर्च अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

इतर देशांच्या तुलने भारतात सेवा महाग

इतर देशांच्या तुलनेत भारतात ही सेवा सात ते आठ पटीने महाग आहे. ही सेवा भारतात फक्त इस्त्रोद्वारे उपलब्ध करता येईल. इतर देशातील कम्युनिकेश उपग्रह हे अंतराळात असल्यामुळे भारतालाही यासाठी विशेष उपग्रह नेमावा लागेल. यामुळे ही सेवा अधिक खर्चीक ठरणार आहे असे मत ह्यजेज इंडिया या ब्रॉडबँड कंपनीचे अध्यक्ष कृष्णा यांनी व्यक्त केला आहे. विमानात प्रवासादरम्यान एकूण प्रवाशांपैकी दहा टक्के प्रवाशांना मोबाईल सेवेची गरज पडते. इतर प्रवाशी हे मोबाईल न वापरण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे कमी प्रवाशांना सुविधा पुरण्यासाठी ही एक मोठी गुंतवणूक असल्याचे मत कृष्णा यांनी व्यक्त केले.

First Published on: December 26, 2018 12:27 PM
Exit mobile version