Coronavirus: इटलीत करोनाचा कहर; एका दिवसात ९१९ जणांचा मृत्यू

Coronavirus: इटलीत करोनाचा कहर; एका दिवसात ९१९ जणांचा मृत्यू

इटलीमध्ये करोना विषाणुमुळे शुक्रवारी तब्बल ९१९ जणांचा मृत्यू झाला.

करोना विषाणुने चीनमध्ये थैमान घातल्यानंतर आता इटलीला आपल्या विळख्यात घेतले आहे. इटलीमध्ये दिवसरात्र केवळ अँबुलन्सचा आवाज येत आहे. कोरोना विषाणूचे केंद्र बनलेल्या इटलीमध्ये मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इटलीमध्ये करोना विषाणुमुळे शुक्रवारी तब्बल ९१९ जणांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात झालेल्या संक्रमणामुळे ९ हजार १३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपामधील ब्रिटन, स्पेन, जर्मनी सारखे देश देखील करोनाच्या विळख्यात आहेत. संपूर्ण युरोपमध्ये करोना विषाणूची ३ लाखाहून अधिक रुग्ण आहेत. एकट्या इटलीबद्दल बोलायचे झाले तर येथे करोना विषाणूचे ८६ हजाराहून अधिक रुग्ण आहेत.


हेही वाचा – Corona Update: करोना निगेटिव्ह व्हायचंय, आयुष्यात निगेटिव्ह होऊ नका – उद्धव ठाकरे


इटलीमध्ये शुक्रवारी तब्बल ९१९ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी ७१२ जणांचा मृत्यू, बुधवारी ६८३, मंगळवारी ७४३ आणि सोमवारी ६०१ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. इटलीने चीनला मागे टाकले आहे. इटलीमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा ८६ हजार ४९८ वर पोहोचला आहे. इटलीच्या लोम्बार्डी भागात आजपर्यंतचा सर्वात मोठा फटका बसला आहे. आधीच्या तुलनेत सर्वात जास्त नुकसान झालेल्या उत्तर भागातील लोम्बार्डीमध्ये मृतांमध्ये बरीच वाढ झाली आहे. लोम्बार्डीमध्ये करोनाचे एकूण ३७ हजार २९८ रुग्ण आढळले आहेत. तर ५ हजार ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

First Published on: March 28, 2020 7:45 AM
Exit mobile version