अमेरिकेचे लक्ष चीनवर…अन् कोरोना आला युरोपमधून

अमेरिकेचे लक्ष चीनवर…अन् कोरोना आला युरोपमधून

सौजन्य - पीटीआय

कोरोना विषाणू अमेरिकेत थैमान घालत आहे. कोरोनाचा संसर्ग अमेरिकेत येऊ नये म्हणून चीन प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, कोरोना चीनमधून न येता दुसरीकडूनच आला. न्यूयॉर्कमध्ये कोरोना चीन नव्हे तर युरोपमधील प्रवासी घेऊन आले. कोरोना विषाणूचे केंद्रबिंदू ठरलेल्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात कोरोना कसा आला? यावर संशोधन करण्यात आलं, या संशोधनात हे उघड झालं. कोरोनाची लागण झालेले युरोपियन पर्यटक फेब्रुवारीमध्ये न्यूयॉर्कला आले. त्यानंतर हा विषाणू राज्यभर पसरला आणि परिस्थिती सतत खालावत गेली. तर संपूर्ण अमेरिकेचे लक्ष चिनी प्रवासी थांबवण्यावर केंद्रित होतं. एका शास्त्रज्ञाने असा दावा केला आहे की अमेरिकेत व्यापक चाचणी सुरू होण्यापूर्वीच विषाणूचा प्रसार होण्यास सुरवात झाली. या संशोधनाचे नेतृत्व करणारे एनवाययू ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसिनचे अनुवंशशास्त्रविषयक प्राध्यापक अॅड्रिआना हेग म्हणाले की कोरोना विषाणूच्या प्रसाराची साखळी शोधून काढल्यास सरकारला कोरोनावर मात करण्यास मदत होईल. ते म्हणाले की, स्थानिक नमुन्यांमध्ये मुख्यतः युरोपियन प्रवासी आहेत. हे घडलं कारण अमेरिकेचे संपूर्ण लक्ष चिनी प्रवासी थांबवण्यावर केंद्रित होतं, मात्र, संक्रमण युरोपमधून आलं.


हेही वाचा – Coronavirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर


सुरुवातीला न्यूमोनियावर म्हणून उपचार करत राहिले

अमेरिकन शास्त्रज्ञ अ‍ॅड्रिआना हेग म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू होण्यापूर्वी इथल्या डॉक्टरांनी या आजाराला न्यूमोनिया म्हणून उपचार करत राहिले. अ‍ॅड्रिआना आणि त्यांच्या टीमने न्यूयॉर्कमधील तीन हॉस्पिटलमधील ७५ रूग्णांचे अनुनासिक नमुन्यांची तपासणी केली.

प्रत्येक हंगामात इन्फ्लूएंझा बदलतो

हेगच्या मते, सर्व जीव कालांतराने बदलतात, परंतु आरएनए व्हायरसच्या प्रत्येक चक्रात काही त्रुटी आढळतात. सार्स-सीओव्ही-2 च्या बाबतीतही हे घडलं. म्हणूनच प्रत्येक हंगामात इन्फ्लूएंझा विषाणू वेगवेगळे असतात आणि नवीन लसींची आवश्यकता असते.

 

First Published on: April 10, 2020 8:46 AM
Exit mobile version