चीफ ऑफ डिफेन्समुळे संरक्षण सामर्थ्यात वाढ होणार – मोदी

चीफ ऑफ डिफेन्समुळे संरक्षण सामर्थ्यात वाढ होणार – मोदी
संपुर्ण देशभरात ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित करत आहेत. याप्रसंगी लाल किल्ल्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत. गेल्या आठवड्यात मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले. या निर्णयानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर काल संसदेत भाषण करताना भारताला थेट युद्धाची धमकी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Harshada Shinkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करतांना यावेळी त्यांनी तिहेरी तलाक, कलम ३७० देशातील गरीबी, देशाची अर्थव्यवस्था, दहशतवाद अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले असून संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात येणार आहे. ते तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांवरील प्रभारी म्हणून काम पाहणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. लाल किल्ल्यावरून निघताना पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित लहान बच्चे कंपनीची भेट घेतली.

Harshada Shinkar

न थकना है, न थमना है न रूकना है या प्रमाणे काम सुरू ठेवणे आवश्यक आहे. २०२२ पर्यंत देशातील किमान १५ पर्यटनस्थळांना भेटी द्या- मोदी

Harshada Shinkar

सर्वच दुकानदारांनी डिजिटल पेमेंटसाठी पुढाकार घेऊन, कॅशलेश भारताच्या दिशेन वाटचाल करावी. – मोदी

Harshada Shinkar

प्लास्टीकमुक्तीसाठी अभियान सुरू करण्याची गरज असून मेड इन इंडिया या वस्तूंना आपण प्राथमिकता दिली पाहिजे. २ ऑक्टोबरपासून पुनर्प्रक्रिया करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करण्याचा संकल्प करू- मोदी

Harshada Shinkar

चीफ ऑफ डिफेन्समुळे संरक्षण सामर्थ्यात वाढ होणार आहे. चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी पद अस्तित्त्वात येणार असून हे पद तिन्ही दलांच्या वर काम करणारं असणार आहे. – मोदी

First Published on: August 15, 2019 7:52 AM
Exit mobile version