IndependenceDay : देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

IndependenceDay : देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

देशभरात ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळ आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि बंगला ते महाराष्ट्रापर्यंत सर्व राज्यांमध्ये १५ ऑगस्टच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडत आहे. लाल किल्लयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित केले. तर गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण केले. विविध राज्यांमध्ये पारंपारिक संगीत आणि नृत्याचे सादरीकरण करून नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाचा आनंद व्यक्त केला.

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा केला जात आहे. श्रीनगरमध्येही शेर-ए-कश्मीर मैदानावर झेंडा वंदन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे सचिव भैय्याजी जोशी यांनी नागपूरमध्ये ध्वजारोहण केले. तर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी लोकांना संबोधित केले.

जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाख हे दोन वेगळे राज्य घोषित केल्यानंतर लेहमध्ये देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण केले.

First Published on: August 15, 2019 11:08 AM
Exit mobile version