Appsच्या बंदीनंतर चीनच्या व्यापार युद्धाच्या धमक्या, म्हणे…

Appsच्या बंदीनंतर चीनच्या व्यापार युद्धाच्या धमक्या, म्हणे…

Appsच्या बंदीनंतर चीनच्या व्यापार युद्धाच्या धमक्या, म्हणे...

भारत सरकारने चीनच्या ५९ Appsवर बंदी घातल्यानंतर चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रित असलेले वृत्तपत्र ग्लोबर टाईम्स लिहिले आहे की, या घेतलेल्या निर्णयाचा परिणाम म्हणून चीनबरोबरच्या व्यापार युद्धाकडे भारताने दुर्लक्ष करू नये. चिनी वृत्तपत्राने २०१७चा डोकलाम वादाचा संदर्भ देताना लिहिले की, गेल्या अनेक वर्षांत काही वेळा चीन-भारत सीमेवरून वाद झाले आहेत. परंतु व्यापार युद्ध दोन्ही देशांसाठी असामान्य आहे. २०१७ मध्ये डोकलाम वादाच्या दरम्यान भारताचे आर्थिक नुकसान मर्यादित राहिले कारण संकटानंतर लवकरच द्विपक्षीय व्याापर सुरू झाला होता.

ग्लाोबल टाईम्सने लिहिले आहे की, Appsच्या बंदीमुळे चिनी कंपन्यांचे नुकसान होईल हे नाकारता येणार नाही. परंतु चीन सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवले या स्थितीत भारत नाही आहे.

सीमेवरील संघर्षानंतर चीन द्विपक्षीय आर्थिक व व्यापार करार जपण्यासाठी भारत सरकारबरोबर प्रयत्न करीत आहे. यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल. पण आता असं वाटतं की, मोदी सरकार भारतीयांमध्ये वाढता राष्ट्रवाद रोखण्यात अपयशी ठरले आहे, असं चिनी वृत्तपत्रात लिहिले आहे.

देशातील वाढत्या राष्ट्रवादाच्या दबावामुळे मोदी सरकारने Appsवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पण भारत सरकारने चिनी गुंतवणूकदारांचा विश्वास तोडला आहे. जर भारत सरकार देशातील राष्ट्रवादी भावनेला अशा प्रकारे चालना देत असेल तर डोकलाम संकटाच्या तुलनेपेक्षा अधिक मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. सरकार परिस्थिती समजेल आणि सध्याचे संकट वाढण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा ग्लोबल टाईम्सचा वृत्तपत्रात व्यक्त केली आहे.


हेही वाचा – भारत-चिनी सैनिक पुन्हा एकदा ‘आमने-सामने’


 

First Published on: July 1, 2020 7:08 PM
Exit mobile version