भारत-चीन सैनिकात चकमक; एक अधिकारी, दोन जवान शहीद

भारत-चीन सैनिकात चकमक; एक अधिकारी, दोन जवान शहीद

भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाल्याचं समोर येत आहे. यामध्ये एक भारतीय अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. तसेच चीनने सैनिक देखील मारले गेल्याचे सांगितले जात आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात ही चकमक झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीनमध्ये संबंध तणावपूर्वक आहे. गलवान खोरच्या सीमेवर दोन्ही बाजूला भारत-चीनने आपले सैन्य तैनात केले आहेत. अशा पद्धतीने हिंसक चकमक १९६७ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये झाली आहे. त्यामुळे आता भारत-चीनमध्ये आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे.

 

सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये ही चकमक झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. यावेळी चीनने केलेल्या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. तसेच या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढू नये यासाठी वरिष्ठ अधिकारी आपापसांत चर्चा करत आहेत, अशी अधिकृत माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विरोधात उभा आहे. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसवरून लक्ष हटवण्यासाठी अशाप्रकारच्या कुरापती चीन करत आहे, असे संरक्षक तज्ज्ञांचे मत आहे. तसेच या चीनच्या कुरापती पाहता त्यांनी उत्तर देणे गरजेच आहे. चीनला जशास तसं भारताने उत्तर द्यायला हवं, असे देखील संरक्षक तज्ज्ञ म्हणाले.

याबाबत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘भारतीय सैनिकांकडून दोन दा चिनी सैनिकांवर हल्ला करण्यात आला. ‘ या सर्व पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरः शोपियांमध्ये चकमक; ३ दहशतवाद्यांना कंठस्नान


 

First Published on: June 16, 2020 1:21 PM
Exit mobile version