भारत-चीन तणाव वाढला; दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर्समध्ये हॉटलाइनवर खडाजंगी

भारत-चीन तणाव वाढला; दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर्समध्ये हॉटलाइनवर खडाजंगी

लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये अद्याप तणाव सुरुच आहे. सोमवारी सीमेवर झालेल्या घटनेनंतर भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले. पँगाँग सरोवर जवळील रेझांग ला येथे दोन्ही बाजूंनी सुमारे ४०-५० सैनिक एकमेकांसमोर आले. दरम्यान, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांची लष्करी पातळीवरही चर्चा सुरू आहे. पण आज हॉटलाईनवर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर्समध्ये वाद झाला.

पूर्व लडाखमध्ये सामान्य स्थिती निर्माण करण्यासाठी समोरासमोर न येण्याऐवजी दोन्ही देशाच्या सैन्याच्या ब्रिगेडियर्सनी हॉटलाईनवर चर्चा केली. यावेळी, दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर्समध्ये खडाजंगी झाली. समोरासमोर बसून चर्चा करण्याऐवजी दोन्ही देशातील सैन्यातील अधिकारी हॉटलाइनवर चर्चा करत आहेत हे सीमेवरील तणाव विकोपाला गेल्याचे संकेत आहेत.

लडाखमधील मुखपरी शिखर चिनी सैनिकांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर्समध्ये जोरदार खडाजंगी झाली. या शिखरावर सध्या भारतीय लष्कराचा ताबा आहे. चिनी सैनिकांनी शस्त्रं घेऊन जाणं हा मार्शल कल्चरचा भाग आहे. पण भारतीय जवानांनी सोमवारी रात्री गोळीबार करून सीमेवरील प्रोटोकॉलचे उल्लंघन केलं आहे, असा कांगावा चीनच्या ब्रिगेडियरने केला.

First Published on: September 9, 2020 8:10 AM
Exit mobile version