LAC जवळ सैन्याने केला युद्धाचा अभ्यास

LAC जवळ सैन्याने केला युद्धाचा अभ्यास

भारत-चीन तणावादरम्यान भारतीय सैन्य आणि हवाई दलाने लेह येथे युद्धाचा संयुक्त सराव केला आहे. या अभ्यासामध्ये लढाऊ आणि वाहतूक विमानाचा सहभाग होता. दोन्ही सैन्य दलात समन्वय वाढवणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. या अभ्यासात सुखोई लढाऊ विमान आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश होता.

भारतीय सैन्य जाणून आहे की सध्याच्या गतिरोधमुळे वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) संरक्षण ढाल कमी करता येणार नाही. गलवान खोरे, पँगॉंग लेक आणि दौलत बेग ओल्दी भागात चिनी सैन्य अजूनही पूर्वीसारखं आहे. अशा परिस्थितीत भारत कोणतीही जोखीम स्विकारणाच्या स्थितीत नाही आहे. लडाखच्या लेह प्रदेशात भारतीय सैन्य आणि हवाई दलाने युद्धाचा अभ्यास सुरु केला आहे. सुखोई -३० एमकेआयची अत्याधुनिक लढाऊ विमानाचा भारतीय लष्करामध्ये समावेश होणार आहे. त्याच वेळी, हर्क्युलस आणि मालवाहू विमानांचा देखील सैनिकी रसद आणि सैनिकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वेगाने हलविण्यासाठी समावेश करण्यात येणार आहे. विमानांचा सराव देखील सैन्यांनी केला.


हेही वाचा – पंतप्रधानांच्या ‘त्या’ विधानामागे रणनीती होती का? – पृथ्वीराज चव्हाण


दरम्यान, आज दोन दिवसांच्या लडाख दौर्‍यावरुन परतल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी भेट घेतली. लडाख क्षेत्रातील परिस्थितीची माहिती संरक्षमंत्र्यांना दिली. सेना प्रमुख पूर्व लडाखमध्ये दोन दिवसांच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागाची पाहणीही केली.

 

First Published on: June 26, 2020 3:44 PM
Exit mobile version