India Corona Update: देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; २,०७,०७१ रुग्ण कोरोनामुक्त

India Corona Update: देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; २,०७,०७१ रुग्ण कोरोनामुक्त

Coronavirus India Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत घट, तर ३,४०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद

देशात सध्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. गुरुवारी १ लाख ३४ हजार १५४ नव्या रुग्णांची वाढ झाली होती. मात्र कालच्या तुलनेत आज शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ३२ हजार ३६४ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ७१३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ लाख ७ हजार ७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ४० हजार ७०२ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्या १६ लाख ३५ हजार ९९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत २२ कोटी ४२ लाख ९ हजार ४४८ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात ३५ कोटी ७४ लाख ३३ हजार ८४६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत २० लाख ७५ हजार ४२८ जणांचा नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत १७ कोटी २८ लाख ८८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३७ लाख १६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ५५ लाख ९९ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

First Published on: June 4, 2021 10:06 AM
Exit mobile version