India Corona Update : देशात 1 लाख 27 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट 8 टक्क्यांनी घटला

India Corona Update : देशात 1 लाख 27 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट  8 टक्क्यांनी घटला

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1150 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज मोठी घट झाल्याचे पाहयला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 27 हजार 952 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्हीटी रेट देखील 8 टक्क्यांनी खाली आला आहे. भारतात आता कोरोना पॉझिटिव्हटी रेट 7.98 टक्क्यांवर आहे. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्णांचा दर 13 टक्कांनी घटला आहे, काल म्हणजे पाच फेब्रुवारीला हा दर 14.4 टक्क्यांनी घटला होता. गेल्या 24 तासांत देशभरात 1059 जणांना कोरोनामुळे आपला

देशात आज नोंद झालेल्या कोरोना रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 4 कोटी 20 लाख 80 हजार 664 वर पोहचली आहे. तर कोरोना मृतांची संख्या 5 लाख 1 हजार 114 झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत केरळ राज्य अव्वल स्थानी आहे. केरळमध्ये सध्या 38684 रुग्णांची नोंद झाली आहे. तर कर्नाटक 14950 रुग्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय महाराष्ट्र 13840 रुग्णांसह तिसऱ्या, तामिळनाडू 9916 रुग्णांसह चौथ्या आणि मध्य प्रदेश 6516 रुग्णांसह पाचव्या स्थानावर आहे.

देशातील एकूण नवीन रुग्णांपैकी 65.57 टक्के रुग्ण हे या पाच राज्यांत आहेत. देशातील रिकव्हरी रेट95.64 टक्के राहिला आहे. तर गेल्या 24 तासांत 2 लाख 30 हजार 814 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यासोबतच देशात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 2 लाख 47 हजार 902 वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या  संख्येत एक लाखांहून अधिकने घट झाली आहे. देशात कोरोनाचे 13 लाख 31 हजार 648 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये 1 लाख 3 हजार 921 रुग्णांची घट झाली आहे. कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना लसीकरणालाही वेग आला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात लसीचे 47 लाख 53 हजार 81 डोस लागू करण्यात आले आहेत.


Srinagar Encounter : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर पोलिसांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु

First Published on: February 5, 2022 10:15 AM
Exit mobile version