Live Update: अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांना चर्चेचं आमंत्रण

Live Update: अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांना चर्चेचं आमंत्रण
भाजप नेते गोपीचंद पडळकरांना चर्चेचं आमंत्रण दिल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पडळकरांना चर्चेचं आमंत्रण दिले आहे.
शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील बैठक संपली
गेल्या २ तासांपासून वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थितीत आहेत. एसटी संपासह राजकीय विषयावर चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे.
अनिल परब यांच्या घराबाहेर एसटी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. काही आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांकडून काळी शाई फेकण्याचा प्रयत्न.
शिवसेनेकडून सुनील शिंदे विधान परिषदेसाठी मुंबईतून उमेदवारी अर्ज करणार दाखल
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणेंकडून शशिकांत शिंदेंचा एका मताने पराभव झाला आहे. या निकाला शशिकांत शिंदे यांच समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. शिंदेंच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मिरज गटात मविआच्या विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. तर आटपाटीच्या सोसायटी गटात शिवसेनेच्या तानाजी पाटील यांचा विजय झाला आहे.
देशात गेल्या २४ तासांत ७ हजार ५७९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १२ हजार २०२ जण रिकव्हर झाले आहेत. सध्या देशात १ लाख १३ हजार ५८४ जणांवर उपचार सुरू आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा आज चौदावा दिवस आहे. काल शरद पवारांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे एसटी कर्मचारी आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्यजीत पाटणकर यांच्याकडून पराभव. तर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणेंकडून शशिकांत शिंदेंचा एका मताने पराभव झाला आहे.
एनसीबीची महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. औरंगाबाद, नांदेड, जालन्यासह राज्यात एनसीबीची छापेमारी सुरू आहे. नांदेड शहरातून अफूची बोंडे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
अजूनही आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विलिनीकरणाच्या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम आहेत.
दिल्लीतील प्रदूषण काही कमी होताना दिसत नाही आहे. SAFAR-India नुसार, आज दिल्लीतील हवाई गुणवत्ता निर्देशांक ३१५ असल्यामुळे सध्या ‘अत्यंत वाईट’ श्रेणीमध्ये आहे.
कोरोनाचे निर्बंध शिथिलतेनंतरची आज पहिली अंगारकी संकष्टी आहे. या निमित्ताने सर्व गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दिवेआगारात सुवर्ण गणेशाची आज पुन्हा प्रतिष्ठापना होणार आहे. ९ वर्षांनंतर आज सुवर्ण गुणेशमूर्तीची स्थापना केली जाणार आहे.
चारा घोटाळ्याबाबत आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी लालूप्रसाद पुन्हा एकदा पटना पोहोचले आहेत.
First Published on: November 23, 2021 3:16 PM
Exit mobile version