Live Update : मुंबईत आज १९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,एका रुग्णाचा मृत्यू

Live Update : मुंबईत आज १९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,एका रुग्णाचा मृत्यू

Live update Mumbai Maharashtra

मुंबईत आज १९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर २३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मुंबईत सध्या १,६६८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर केवळ एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.


मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव आणि स्वीय सहाय्यक संजीव पालांडे सह कुंदन शिंदे यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला.


मणिपूर सीमेवर आसाम राईफल्सकडून ५०० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्ज जप्त केलेल्या घरातील महिलेचा पती चीनचा नागरिक असल्याचे समोर आले आहे.


शेतकरी खतांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे असातच खतांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.


ईडीकडून ६ तास सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला गेला


प्रियंका गांधी १४ डिसेंबरला गडचिरोलीच्या दौऱ्यावर, त्यांच्या हस्ते १० हजार विद्यार्थिनींना ई-सायकलचे वाटप केले जाणार


जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाचे कोर्ट मॅरेज


मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा, कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे पैसे दिले जात होते- आशिष शेलार, आशिष शेलारांचा मुंबई महानगरपालिकेवर आरोप. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी झाली, आदित्य ठाकरेंना यासंदर्भात प्रश्न लिहिणार आहे.


सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल


राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक,


आज राहुल गांधी यांची भेट घेणार आहे- संजय राऊत


जैन साधू पद्मसागरजी राज ठाकरेंच्या भेटीला, सदिच्छा भेट असल्याची माहिती


मुंबईत ओमिक्रॉनचे २ नवे रुग्ण सापडले असून देशातील एकूण रुग्णसंख्या २३ वर पोहचली आहे. यात महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १० वर पोहचली आहे.


 

First Published on: December 7, 2021 9:45 PM
Exit mobile version