India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांच्या आकडा ४२ हजार पार, मृतांची संख्याही वाढली

India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांच्या आकडा ४२ हजार पार, मृतांची संख्याही वाढली

India Corona Update:

कोरोना रुग्णसंख्येने जगभरात हाहाकार माजवला आहे. यात भारतातही कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक कमी अधिक प्रमाणात पुन्हा वाढत आहे. गेल्या काही दिवसांत ४० हजारांचा टप्पा गाठणारी रुग्णसंख्या मध्येच ४५ हजारांचा टप्पा गाठत आहे. मृतांची संख्याही १ हजारांच्या वर पोहचली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४२ हजार ७६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४५ हजार २५४ रुग्णांनी कोरोना यशस्वी मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर १ हजार २०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत ३ कोटी ०७ लाख ९५ हजार ७१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ४ लाख ५५ हजार ३३ इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत देशात ४ लाख ७ हजार १४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३६ कोटी ८९ लाख ९१ हजार २२२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत देशभरात ४२ कोटी ९० लाख ४१ हजार ९७० नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी ९ जुलै रोजी १९ लाख ५५ हजार २२५ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


First Published on: July 10, 2021 10:03 AM
Exit mobile version