भारतात सापडला मोठा खजिना; आता अमेरिका आणि चीनलाही मागे टाकणार

भारतात सापडला मोठा खजिना; आता अमेरिका आणि चीनलाही मागे टाकणार

हा एक दुर्मिळ पृथ्वी घटक आहे, ज्याचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो.

Lithium deposits found in Jammu & Kashmir : देशात प्रथमच लिथियमचे साठे सापडले. त्याची क्षमता ५९ लाख टन आहे. ही पहिली लिथियम साइट असून जम्मू आणि काश्मीरमधल्या रियासीमध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणद्वारे सापडली आहे. लिथियम हा एक नॉन-फेरस मेटल आहे, ज्याचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. हा एक दुर्मिळ पृथ्वी घटक आहे. लिथियमसाठी भारत सध्या पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामूळे भारतातच लिथियमचा साठा सापडल्याने मोबाईल आणि EV मधील बॅटरी भारतातच बनवता येणं शक्य होणार आहे.

भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयात करतो. २०२० पासून लिथियम आयातीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. भारत आपल्या लिथियम-आयन बॅटरीपैकी ८०% चीनमधून मिळवतो. या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी भारत अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यांसारख्या लिथियम समृद्ध देशांमधील भागभांडवल विकत घेण्यावर काम करत आहे. ईव्ही वाहनांची मागणी वाढल्याने भविष्यात लिथियमची मागणी झपाट्याने वाढणार आहे. आता भारताचा स्वतःचा साठा आहे, याचा अर्थ चीनचे वर्चस्व संपणार आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात 5.9 दशलक्ष टन लिथियमचा अंदाजे स्रोत सापडला आहे. मंत्रालयाने माहिती दिली की, “लिथियम आणि सोन्यासह खनिज ब्लॉक संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आले आहेत. या 51 खनिज ब्लॉक्सपैकी 5 ब्लॉक्स सोन्याचे आहेत आणि इतर ब्लॉक्स जम्मू आणि काश्मीर (UT) सह 11 राज्यांमध्ये आहेत. यात आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. हे ब्लॉक्स पोटॅश, मॉलिब्डेनम, बेस मेटल इत्यादी घटकांशी संबंधित आहेत.

First Published on: February 10, 2023 2:16 PM
Exit mobile version