Coronavirus: भारतात प्रत्येक २४ टेस्टमागे एक कोरोना पॉझिटिव्ह आढळतोय

Coronavirus: भारतात प्रत्येक २४ टेस्टमागे एक कोरोना पॉझिटिव्ह आढळतोय

भारतात कोरोना चाचण्यांची संख्या आता वाढविण्यात आली आहे. सध्या प्रत्येक २४ टेस्टमागे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. याचा अर्थ सध्या भारतात इटली, जपान आणि इतर देशांच्या तुलनेत मोठा धोका अद्यापतरी नाही, अशी माहिती इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने गुरुवारी दिली. ज्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या व्हायला हव्यात तेवढ्या होत नसल्याचा आरोप केल्यानंतर आयसीएमआरने ही माहिती दिली आहे.

जपानमध्ये ११ रुग्णांची चाचणी केल्यानंतर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो. तर इटलीमध्ये दर ३.४ चाचण्यामागे एक कोरोनाचा रुग्ण आणि युकेमध्ये ५.३ चाचण्यामागे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. या तीन देशांशी आपली तुलना केल्यास सध्यातरी आपण समाधानकारक स्थितीमध्ये आहोत, अशी प्रतिक्रिया ICMR चे संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख रमन गंगाखेडकर यांनी दिली.

काल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी याच विषयावर पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी आपण कोरोना जिथे आढळत आहे, तिथेच चाचण्या घेत आहोत. हा परिणामकारक पर्याय नसून समूहात जाऊन चाचण्या घ्यायला हव्यात असे सांगितले होते. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने आपल्यावर होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. ICMR ने सांगितले की, लोकसंख्येच्या प्रमाणात चाचण्या घेणे सध्यातरी शक्य होणार नाही. तसेच कोरोनाच्या रुग्ण समोरून आढळत असताना कम्युनिटी टेस्टिंग करणे योग्य होणार नाही.

मागच्या आठवड्यात आयसीएमआरने १ लाख चाचण्या घेतल्या. जे कोरोनाबाधितांच्या जवळच्या संपर्कात आहेत, त्यांच्या चाचण्या घेण्यावर सध्या आपण भर दिलेला आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मुंबईत मात्र मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात येत आहेत. मुंबईत भारतातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतातील १३ हजार रुग्णांपैकी २००० रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.

चाचण्या घेण्याचे सहा निकष

भारतात कोरोनाची चाचणी घेण्याचे साहित्य मर्यादित स्वरुपात असल्यामुळे आपण चाचणी घेण्यासाठी सहा निकष लावलेले आहेत, असे भारताचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संसर्गजन्यरोग तज्ज्ञ गिरीधरा बाबू यांनी सांगितले.

First Published on: April 17, 2020 11:53 AM
Exit mobile version