भारतात सलग पाचव्या दिवशी ५० हजारांहून कमी रुग्णसंख्या

भारतात सलग पाचव्या दिवशी ५० हजारांहून कमी रुग्णसंख्या

देशभरात सलग पाचव्या दिवशी नवीन रुग्णाची संख्या ५० हजारांच्या आत राहिली आहे. २४ तासात ४७,९०५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण बरे होण्याची दैनंदिन संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त असण्याचा कल ४० व्या दिवशीही कायम आहे. २४ तासात ५२,७१८ रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४.९८ लाख आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी केवळ ५.६३ टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ही संख्या ५ लाखांपेक्षा कमी म्हणजेच ४,८९,२९४ इतकी आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असल्याने रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे. सध्या हा दर ९२.८९ टक्के इतका आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८०,६६,५०१ वर गेली आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यातील अंतर झपाट्याने वाढत असून ७५,७७,२०७ झाले आहे.

First Published on: November 12, 2020 7:54 PM
Exit mobile version