भारतात २२ मार्चपासूनचा सर्वात कमी मृत्यू दर

भारतात २२ मार्चपासूनचा सर्वात कमी मृत्यू दर

रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनासाठी केंद्र, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या लक्ष्यकेंद्री प्रयत्नामुळे भारतातला मृत्यू दर १.५ टक्के झाला आहे. देशात गेल्या २४ तासात ४८० मृत्यूंची नोंद झाली आहे. प्रतिबंधासाठी प्रभावी रणनीती, मोठ्या प्रमाणात चाचण्या, सरकारी आणि खाजगी रुग्णालयात प्रमाणित मानक वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे.

जगभरात कमी मृत्यू दर असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. २२ मार्चपासून मृत्यू दर कमी आहे. त्यात सातत्याने घट होत आहे. कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसाद धोरणाचा एक भाग म्हणून कोविडला प्रतिबंध करण्याबरोबरच गंभीर आजारी रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवून मृत्यू दर कमी करण्यावरही केंद्र सरकारचा भर राहिला आहे. केंद्र, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नातून देशभरात आरोग्य सुविधा बळकट झाल्या आहेत. राज्य रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये काम करणार्‍या डॉक्टरांसाठी तज्ज्ञांकडून टेली किंवा व्हिडीओ सल्ला सत्रे आयोजित करण्यात येतात. ८ जुलैपासून ही चर्चा सत्रे होत आहेत. आतापर्यंत २५ टेली सत्रे आयोजित करण्यात आली असून ३४ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातल्या ३९३ संस्था यात सहभागी झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग लवकर होण्याचा धोका असलेल्या वृद्ध,गर्भवती आणि विविध आजार असलेल्या व्यक्तीबाबत माहिती घेण्यासाठी राज्य सरकारांनी यासंदर्भात लोकसंख्या सर्वेक्षण केले. मोबाईल अ‍ॅप यासारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने, जास्त धोका असलेल्या अशा लोकांच्या प्रकृतीबाबत लक्ष ठेवणे सुनिश्चित होऊन आजार वेळीच ओळखणे, तत्पर वैद्यकीय उपचार होऊन मृत्यू दर कमी होण्यासाठी मदत झाली. स्थलांतरित लोकांचे व्यवस्थापन आणि सामाजिक स्तरावर जन जागृती करण्यासाठी आशा सेविका आणि एएनएम यांची कामगिरी प्रशंसनीय आहे.

एका दिवसात बरे होणार्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सातत्याने वाढत असून हा दर वाढून ९०.२३ टक्के झाला आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होण्याचा कल भारताने कायम राखला आहे. सध्या सक्रीय रुग्ण हे देशातल्या पॉझीटीव्ह रुग्णांच्या ८.२६ टक्के असून ही संख्या ६,५३,७१७ आहे. १३ ऑगस्टपासून ही सर्वात कमी संख्या असून त्या दिवशी ही संख्या ६,५३,६२२ होती. गेल्या २४ तासात ४५,१४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. २२ जुलैपासून ही सर्वात कमी संख्या आहे, २२ जुलैला ही संख्या ३७,००० होती.

First Published on: October 26, 2020 4:43 PM
Exit mobile version