आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार? ‘या’ देशात जाण्यासाठी विमान ‘टेक ऑफ’च्या तयारीत!

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार? ‘या’ देशात जाण्यासाठी विमान ‘टेक ऑफ’च्या तयारीत!

डासांनी झाला विमानाला 'लेटमार्क'

१ जुलैला भारताने परदेशातील विमानसेवा बंद करून १०० दिवस पुर्ण झाले. आता आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं सुरू करण्यासंदर्भात अमेरिका, कॅनडा आणि मध्यपूर्वेकडे विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे. अशी माहिती भारताच्या एअरपोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष अरविंद सिंग यांनी दिली.

अरविंद सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, कॅनडा आणि यूएई यांच्याशी चर्चा पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे. कदाचित याच महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत सुरू होईल. भारतातही प्रत्येक राज्यात सध्या क्वारंटाईन आणि इतर नियम वेगवेगळे असल्याने बाहेरचे देश आणि देशांतर्गत राज्य या दोन्ही बाजूंनी चर्चा होणं अपेक्षित आहे.

सिंग म्हणाले की, ‘देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांकडून विमानसेवा सुरळीत करण्याची मागणी सातत्याने होत आहेत. ते सध्या ज्या देशात राहात आहेत, त्यांच्याकडूनही अशी परवानगी मिळणं त्यासाठी आवश्यक आहे. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत.’

गेल्याच आठवड्यात युरोपीय महासंघाने आंतरराष्ट्रीय प्रवासाचे निर्बंध शिथिल केले आणि काही देशांतून विमानसेवेला परवानगी दिली. पण या परवानगी मिळालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश नव्हता. ही यादी दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा नव्याने तयार होईल, अशी अपेक्षा भारताला आहे.


हे ही वाचा – तज्ज्ञ म्हणतात, १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस येणं निव्वळ अशक्यच!


 

First Published on: July 3, 2020 8:47 PM
Exit mobile version