४० वर्षांत भारत सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश

४० वर्षांत भारत सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश

अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरने एक धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या अहवालानुसार, पुढील 40 वर्षांनंतर भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश असेल. येत्या 40 वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या कशी वाढेल, याबद्दलचा आढावा प्यू रिसर्च सेंटरकडून घेण्यात आला आहे. 2060 मध्ये सर्वाधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्या असलेल्या देशांची यादी प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केली आहे.

सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत इंडोनेशिया प्रथम क्रमांकावर आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार, इंडोनेशियात 21,99,60,000 मुस्लिम धर्मीय वास्तव्यास आहेत.

या यादीत सध्या भारत दुसर्‍या स्थानी आहे. भारतात 19,48,10,000 मुस्लिम धर्मीय राहतात. शेजारी पाकिस्तान याच यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या मुस्लिम धर्मीयांची संख्या 18,40,00,000 आहे.

First Published on: April 4, 2019 6:17 AM
Exit mobile version