Travel Advisory : परदेशातून येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक, केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स

Travel Advisory : परदेशातून येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक, केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स

देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या सुचनांनुसार, परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना आता विमानतळावर आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक असणार आहे. मात्र तो आरटी-पीसीआर रिपोर्ट प्रवासाच्या ७२ तास आधीचा असावा.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट प्रवासाच्या ७२ तास आधीचा असण्याबरोबरच सर्व प्रवाशांना या रिपोर्टच्या सत्यतेबाबतचे घोषणापत्र देखील द्यावी लागेल. हे नवीन नियम २५ ऑक्टोबरपासून लागू होतील.

भारत सरकारने अशा देशांची यादी देखील जारी केली आहे जिथून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आवश्यकत्या नियमांचे पालन करावे लागेल. यात भारतात आल्यानंतर कोरोना चाचणीचाही समावेश आहे. या यादीमध्ये युनायटेड किंगडमसह दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यासह युरोपमधील देशांचा समावेश आहे. या देशांना कोरोना संसर्गाचा धोका असलेल्या देशांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रीय मान्यताप्राप्त किंवा WHO मान्यताप्राप्त कोरोनाविरोधी लसीद्वारे लसीकरण पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारने अनेक देशांसह परस्पर मान्यता लसीकरण प्रमाणपत्रासाठी करार केला आहे. त्यामुळे भारताने लसीकरणसंबंधीत करार केलेल्या देशांमध्ये राष्ट्रीय मान्यताप्राप्त किंवा WHO मान्यताप्राप्त कोरोनाविरोधी लसी देणाऱ्यांना निर्बंधांतून सवलत असेल.|

हे देश म्हणजे युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, नेपाळ, बेलारूस, लेबनॉन, आर्मेनिया, युक्रेन, बेल्जियम, हंगेरी आणि सर्बिया. जिथे कोविशिल्ड लसीद्वारे पूर्णपणे लसीकरण झालेय अशा नागरिकांना क्वारंटाइनशिवाय प्रवास करता येणार आहे.


 

First Published on: October 21, 2021 8:31 AM
Exit mobile version