CoronaVirus: देशातील कोरोनाबाधित रुग्णांनी लाखाचा आकडा केला पार!

CoronaVirus: देशातील कोरोनाबाधित रुग्णांनी लाखाचा आकडा केला पार!

प्रातिनिधिक छायाचित्र

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतच आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणित वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकड्या एक लाखांहून अधिक झाला आहे. गेल्या २४ तासांत ४ हजार ९७० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक लाख एक हजार १३९वर पोहोचल आहे. तर मृतांचा आकडा ३ हजार १६३ झाला आहे. तसंच गेल्या २४ तासांत २ हजार ७१५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत देशात ३६ हजार ८२४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

१ मेनंतर तब्बल ६५ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रातील ३५ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सोमवारी २ हजार ३३ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजार ५८ इतका झाला आहे. तर ५१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १ हजार २४९वर पोहोचला आहे.

देशात महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि दिल्ली या राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तसंच देशातील मोठ्या शहरातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरात आहे.


हेही वाचा – CoronaVirus: देशातील कोरोनाबाधित रुग्णांनी लाखाचा आकडा केला पार!


 

First Published on: May 19, 2020 9:55 AM
Exit mobile version