India corona update: देशातील कोरोना मृत्यूच्या संख्येत मोठी घट! 24 तासांत 3614 नव्या रुग्णांची वाढ, तर 89 जणांचा मृत्यू

India corona update: देशातील कोरोना मृत्यूच्या संख्येत मोठी घट! 24 तासांत 3614 नव्या रुग्णांची वाढ, तर 89 जणांचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळाले. पण यादरम्यान मृत्यूच्या संख्येत घट होत नव्हती. मात्र आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसोबत मृत्यूच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळाली. काल, शुक्रवारी देशात 4 हजार 194 नवे कोरोनाबाधित आढळले होते आणि 255 जणांच्या मृत्यूची होत झाली होती. मात्र कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 580 रुग्णांची घट झाली आहे, तर मृत्यूच्या संख्येत 166ने घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 614 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 89 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 5 हजार 185 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात 40 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र ज्या राज्यांमध्ये कोरोना स्थिती नियंत्रणात आली आहे, त्या राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. मागच्या आठवड्यात महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यामध्ये 100 टक्के क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट्स, नाट्यगृह, चित्रपटगृह, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही, मॉल्स, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, गार्डन सुरू करण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच खासगी आणि सरकार कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – 4 कोटी 29 लाख 87 हजार 875
देशातील एकूण मृत्यूची संख्या – 5 लाख 15 हजार 803
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – 4 कोटी 24 लाख 31 हजार 513
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – 40 हजार 559
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – 77 कोटी 77 लाख 15 हजार 932
देशातील एकूण लसीकरण – 1 कोटी 79 कोटी 91 लाख 57 हजार 486


हेही वाचा – China Lockdown: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, शहरात लॉकडाऊन


 

First Published on: March 12, 2022 9:50 AM
Exit mobile version