India Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ३ हजाराने मृत्यूच्या संख्येत वाढ; ४२ हजारांहून अधिक नवे रूग्ण

India Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ३ हजाराने मृत्यूच्या संख्येत वाढ; ४२ हजारांहून अधिक नवे रूग्ण

जग कोरोना संकटातून लवकर मुक्त होणार नाही, WHO ने दिला इशारा

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येसह कोरोनाने मृत्यू होणाऱ्याच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात मंगळवारी ३० हजार ९३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३७४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली करण्यात आली होती. तर आज बुधवारी गेल्या २४ तासात ४२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून मृत्यूच्या संख्येत ३ हजाराने वाढ झाल्याचे समोर आले आहे. आज देशात ३६ हजार ९७७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार १५ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३९९८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३६ हजार ९७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १२ लाख १६ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख १८ हजार ४८० जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ३ लाख ९० हजार ६८७ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ७ हजार १७० जणांवर उपचार सुरू आहेत.

देशभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सूरू आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील लसीकरणाचा टप्पा ४१ कोटी पार केला असून आतापर्यंत ४१ कोटी ५४ लाख ७२ हजार ४५५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात २० जुलैपर्यंत ४४ कोटी ९१ लाख ९३ हजार २७३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या. यापैकी काल दिवसभरात १८ लाख ५२ हजार १४० नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली.

First Published on: July 21, 2021 10:36 AM
Exit mobile version