India Corona Update: गेल्या २४ तासात ४३,३९३ नवे रुग्ण; ४० लाख २३ हजारांहून अधिकांचे लसीकरण

India Corona Update: गेल्या २४ तासात ४३,३९३ नवे रुग्ण; ४० लाख २३ हजारांहून अधिकांचे लसीकरण

आज देशात गेल्या २४ तासात ४३ हजार ३९३ जणांना कोरोनाची लागण झाली तर ९११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज ४४ हजार ४५९ वर पोहचली आहेत. यासह ४० लाख २३ हजारांहून अधिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४३ हजारांहून अधिक बाधित आढळ्याने देशातील एकूण बाधितांचा आकडा हा ३ कोटी ७ लाख ५२ हजार ९५० झाला आहे. तर आजपर्यंत २ कोटी ९८ लाख ८८ हजारांहून अधिक रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ४ लाख ५८ हजार ७२७ इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत देशात ४ लाख ५ हजार ९३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३६ कोटी ८९ लाख ९१ हजार २२२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

गुरूवारी देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढून गेल्या २४ तासात ४५ हजाराहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. यासह ४४ हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली असून ८१७ जणांचा मृत्यू झाला होता. तर आज शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडीवारी नुसार, देशात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. यासह गुरूवार ८१७ जणांचा कोरोनाने बळी गेला होता तर आज हा आकडा वाढून ९११ वर पोहोचला आहे. त्यामुळे देशात कोरोनाने बळी जाणाऱ्यांमुळे चिंता कायम आहे. दिलासादायक बाब म्हणजे कालच्या तुलनेत आज कोरोनावर मात करण्याच्या आकड्यात वाढ झाली असून काल हा आकडा ४४ हजार २९१ होता तर आज ४४ हजार ४५९ असा झाला आहे.

 

आतापर्यंत देशभरात ४२ कोटी ७० लाख १६ हजार ६०५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी ८ जुलै रोजी १७ लाख ९० हजार ७०८ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

First Published on: July 9, 2021 12:02 PM
Exit mobile version