Coronavirus India Update देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, तर मृतांचा आकडाही १ हजारांवर

Coronavirus India Update देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, तर मृतांचा आकडाही १ हजारांवर

India Corona Update:

देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज पुन्हा मोठी वाढ झाली आहे. देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत अडीच हजारांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात ४५ हजार ९५१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले होते, मात्र आज तब्बल २८०० पेक्षा अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे.तर मृतांचा आकडाही १ हजारांवर पोहचला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत देशात ४८ हजार ७८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ०५ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात देशात ६१ हजार ५८८ जण कोरोनामुक्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ३ कोटी ०४ लाख ११ हजार ६३४ वर गेला आहे. देशात २ कोटी ९४ लाख ८८ हजार ९१८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ९९ हजार ४५९ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ८ लाख २३ हजार २५७ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. देशात आत्तापर्यंत ३३ कोटी ५७ लाख १६ हजार ०१९ नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात आत्तपर्यंत ४१ कोटी २० लाख २१ हजार ४९४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील १९ लाख २१ हजार ४५० चाचण्या गेल्या २४ तासांत झाल्याचे आयसीएमआरने सांगितले.


Corona Vaccine : Zydus Cadila ने लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी DGCI कडे मागितली मंजुरी


 

First Published on: July 1, 2021 10:38 AM
Exit mobile version