देशभरात २४ तासांत १० हजार ९५६ नवे रुग्ण; ३९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशभरात २४ तासांत १० हजार ९५६ नवे रुग्ण; ३९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ४१ हजार ८४२ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ४७ हजार १९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचे ३ हजार ६०७ नवे रुग्ण

राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ६०७ नवे रुग्ण आढळले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ झाला असून मृतांचा आकडा ३ हजार ५९०वर पोहोचला आहे. तसेच मागील २४ तासांत १ हजार ५६१ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण ४६ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

५ हजार ७३ हजार ६०६ लोक होम क्वारंटाईन

सध्या राज्यात ५ हजार ७३ हजार ६०६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संख्यात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ४९३ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी १०२ पुरुष तर ५० महिला आहेत. तसेच १५२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८५ रुग्ण आहेत तर ५४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १५२ रुग्णांपैकी १०७ जणांमध्ये (७०.३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

मुंबईत कोरोनाचे १५४० नवे रुग्ण

मुंबईमध्ये गुरुवारी १५४० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९८५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९५२ वर पोहोचला आहे. तसेच गुरुवारी ५१६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २७ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – ऑनलाईन शिक्षणासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी


 

First Published on: June 12, 2020 9:54 AM
Exit mobile version