Russia Ukraine War: रशियाबाबत भारताच्या भूमिकेवर जो बायडेन यांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले….

Russia Ukraine War: रशियाबाबत भारताच्या भूमिकेवर जो बायडेन यांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले….

EID 2022 : मुस्लीम समाजाबाबत बायडेन यांचे मोठे विधान, जगभरातील मुस्लिम हिंसाचाराचे बळी

मागील २७ दिवसांपासून युक्रेन रशियाचे मिसाईल हल्ले आणि बॉम्ब हल्ले झेलत आहे. यादरम्यान अमेरिकाचे राष्ट्रपती जो बायडेन यांचे रशियाबाबतच्या भारताच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. बायडेन म्हणाले की, ‘भारत अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमधील अपवाद स्वरुप आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला अदल घडवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लावले आहेत. परंतु भारत याबाबत काहीसा अस्थिर झाला आहे.’

यूएस बिझनेस लीडर्सची बैठक संबोधित जो बायडेन म्हणाले की, ‘क्वाडमध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियाने व्लादिमीर पुतिन यांच्या आक्रमककारी भूमिकेविरोधात कठोर पाऊल उचलले. यामध्ये भारत एक अपवाद आहे, ज्याची याबाबत भूमिका डगमगणारी आहे.’

दरम्यान युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाविरोधात अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी कठोर निर्बंध लावले आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी रशियामधील आपला व्यवसाय बंद केला आहे. यूएनमध्ये या देशांनी रशियाला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरोधात मतही केले. परंतु यात भारताने तटस्थ भूमिका दाखवली.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिनविरोधात एकजुटता दाखवण्यासाठी जो बायडेन यांनी नाटो देश, युरोपियन युनियन आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांचे कौतुक केले. परंतु ज्याप्रकारे क्वाड सदस्यांपैकी एक असलेल्या भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि यूएनमध्ये रशिया विरोधात मत करण्यापासून दूर राहिल्यामुळे बायडेन यांनी भारतावर निशाणा साधला आहे.


हेही वाचा – Ukraine Russia War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन पोलंड दौऱ्यावर, रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आखणार रणनीती?


 

First Published on: March 22, 2022 11:10 AM
Exit mobile version