‘रोमिओ’मुळे वाढणार भारतीय नौदलाची ताकद

‘रोमिओ’मुळे वाढणार भारतीय नौदलाची ताकद

‘रोमिओ’मुळे भारतीय नौदलाच्या ताकदीमध्ये वाढ होणार आहे. रोमिओ अर्थात ‘एमएच-६० रोमिओ सीहॉक’ ही बहुउद्देशीय पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर्स आहेत. जगामध्ये सध्याच्या घडीला अतिशय अत्याधुनिक म्हणून ‘एमएच-६० रोमिओ सीहॉक’ या हेलिकॉप्टर्सकडे पाहिले जाते. ‘एमएच-६० रोमिओ सीहॉक’ ही पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर्स भारत अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीमध्ये वाढ होणार आहे. हिंदी महासागरामध्ये चीनवर दबाव ठेवण्यासाठी ‘एमएच-६० रोमिओ सीहॉक’ हेलिकॉप्टर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. ‘एमएच-६० रोमिओ सीहॉक’ या एका हेलिकॉप्टरची किंमत २ अब्ज डॉलर आहे. भारत अमेरिकेकडून टप्प्याटप्प्यानं १२३ हेलिकॉप्टर्स खरेदी करणार आहे. १२३ ‘एमएच-६० रोमिओ सीहॉक’ हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी १५० अब्ज रूपये खर्च येणार आहे. सध्या ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या नौदलामध्ये कार्यरत आहेत. या हेलिकॉप्टरवरून क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते पाणबुडीचे अचूक वेध घेते. त्यामुळे भारताला त्याचा मोठा फायदा होणार आहे. जगामध्ये इतर देशांकडे देखील हेलिकॉप्टर्स आहेत, पण त्या तुलनेत अमेरिकेकडे असलेली ‘एमएच-६० रोमिओ सीहॉक’ ही हेलिकॉप्टर सरस ठरणार आहेत. हिंदी महासागरामध्ये चीनचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे. चीनचे वाढत प्राबल्य लक्षात घेऊन भारताने अमेरिकेकडे तात्काळ २४ हेलिकॉप्टर्सची मागणी पत्र पाठवून केली आहे. अमेरिकेच्या मदतीनं भारतीय कंपनीच्या भागीदारीतून १२३ हेलिकॉप्टर्सची निर्मिती भारतामध्ये करण्याची योजना आहे. युद्धकाळात शत्रुकडून पाणबुडीवरून हवेत, जमिनीवरच्या लक्ष्यावर क्षेपणास्त्राच्या माध्यमातून मारा केला जातो. त्यामुळे पाणबुडीवर निशाणा साधण्यासाठी ‘एमएच-६० रोमिओ सीहॉक’ हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. त्यामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीमध्ये देखील वाढ होणार आहे.

First Published on: November 18, 2018 9:58 AM
Exit mobile version