भारत लवकरच आर्थिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडेल – अमित शहा

भारत लवकरच आर्थिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडेल – अमित शहा

अमित शाह

सध्याच्या परिस्थितीत भारतात जागतिक मंदीचे तात्पुरते परिणाम दिसत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर यांनी ठोस धोरण तयार केले आहे. त्यामुळे भारत लकरच आर्थिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. शिमला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अनेक क्षेत्रांमध्ये सुस्तीचे वातावरण

मागील काही महिन्यांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदराने ४.५ टक्क्यांची निच्चांकी पातळी गाठली होती. दरम्यान देशातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील आर्थिक मंदीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये सुस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी मोदी सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्था सुस्तावल्याचे विधान केले होते. पण देशात मंदी नाही असेही सीतारामन त्यावेळी बोलल्या होत्या.

हेही वाचा – आदिवासी नृत्य महोत्सवात राहुल गांधींनी धरला ठेका!

First Published on: December 27, 2019 6:26 PM
Exit mobile version