हवामान बदलाचे भारतावर वाईट परिणाम

हवामान बदलाचे भारतावर वाईट परिणाम

हवामान बदलाचे भारतावर वाईट परिणाम

हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी पोलंड येथे संयुक्त राष्ट्र संघाची २४ वी Conference of the Parties ची परिषद होणार आहे. पण त्याआधीच लँसेट या संस्थेने एक महत्त्वापूर्ण अहवाल दिलेला आहे. जागतिक स्तरावर हवामान बदलाचा मानवी जीवनावर वाईट होत आहे. पण जगभरात सर्वात जास्त फटका भारताला बसत असून भारताचे तापमान वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे. लँसेट काऊंटडाऊन २०१८ या अहवालात आरोग्य आणि हवामान बदलाबाबतचा अहवाल गुरुवारी प्रकाशित करण्यात आला आहे. जगभरातील प्रत्येक माणून दीड दिवसांची अतिरीक्त उष्णतेची लाट सहन करावी लागत आहे. या अतिरीक्त उष्णतेचे प्रमाण २००० ते २०१७ सालामध्ये वाढले आहे.

भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास २०१२ च्या तुलनेत २०१६ साली भारताला ४० दशलक्ष अतिरीक्त उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे भारतीय कामगारांनी उन्हात काम करणे टाळले. त्यामुळेच जवळपास ७५ हजार दशलक्ष तास वाया गेले आहेत. २००० साली ४३ हजार दशलक्ष तास वाया गेले होते. मात्र आता त्यांचे प्रमाण आधीपेक्षा जास्त वाढले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाचा – पुण्यातील हवामानात अचानक झाला ‘हा’ बदल

वाढत्या उष्णतेचा सर्वात जास्त तोटा शेतीला बसला आहे. २०१७ साली शेतीत काम करणाऱ्यांचे ६० हजार दशलक्ष तास वाया गेले आहेत. हेच प्रमाण २००० साली ४० हजार दशलक्ष इतके होते. भारताच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडीवारीनुसार लँसेटने हा अहवाल बनवला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या या वार्षिक परिषदेत हवामान बदलातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः विकसित देशांकडून विकसनशील देशांना हवामान बदलाच्या तयारीसाठी निधी देण्याचा प्रयत्न या परिषदेत केला जाणार आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी २७ संस्था, डॉक्टर्स, धोरणात्मक निर्णय घेणारे व्यावसायिक, हवामानावर लिहिणारे लेखक यांनी काम केले आहे.

First Published on: November 29, 2018 11:27 AM
Exit mobile version