लडाखमध्ये ताब्यात घेतलेल्या चीनच्या सैनिकाला भारताने पुन्हा सोपवले

लडाखमध्ये ताब्यात घेतलेल्या चीनच्या सैनिकाला भारताने पुन्हा सोपवले

भारत आणि चीनमध्ये सध्या सीमावादावरुन तणाव निर्माण झाला असताना भारतीय सैनिकांनी मात्र माणुसकीचे दर्शन घडवले आहे. लडाख सीमेवर रस्ता भरकटलेला एक चीनी सैनिक भारताच्या दिशेला आला असता त्याची विचारपूस केल्यानंतर भारतीय जवानांनी त्या सैनिकाला चीनच्या ताब्यात दिले आहे. लडाखच्या देमचोक येथे सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी हा चीनी सैनिक पकडला गेला होता. रस्ता भरकटल्याने तो भारताच्या हद्दीत आला होता. तो चीनी सैन्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याजवळ चिनी सैन्याशीसंबंधित ओळखपत्र आणि आणखी काही कागदपत्रे सापडले.

वँग या लाँग असे या सैनिकाचे नाव आहे. चुशूल मोल्डो येथे या सैनिकाला चीनकडे सुपूर्द करण्यात आले. हा चिनी सैनिक झीजियांग प्रांताचा रहिवाशी आहे. शस्त्रास्त्रे दुरुस्त करण्याचे काम तो करतो. प्रस्थापित शिष्टाचारानुसार, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चुशूल-मोल्डो येथे या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाईल, असे सैन्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार या सैनिकाला चीनकडे सोपवण्यात आले आहे.

भारत-चीन सीमावाद सोडवण्यासाठी कोर कमांडर्सची आतापर्यंत सात बैठका झाल्या आहेत. मात्र, त्यातून काहीच निषपण्ण झालेले नाही. या आठवड्यातदेखील कोअर कमांडर्सची आठवी बैठक आहे. सातव्या बैठकीत दोन्ही पक्षांचे चर्चेतून प्रश्न सोडवण्याबाबत एकमत झाले होते.

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांचा आज पाहणी दौऱ्याचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता

First Published on: October 21, 2020 9:27 AM
Exit mobile version