भारतीय उद्योगपतीची कमाल; जेवढ्या पगड्या, तेवढ्या रॉल्स रॉयस कार

भारतीय उद्योगपतीची कमाल; जेवढ्या पगड्या, तेवढ्या रॉल्स रॉयस कार

भारतीय उद्योगपती रुबेन सिंह

एका सरदाराने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर जगात स्वत:ची ओळख बनवली आहे. सध्या सोशल मीडियावर या सरदरारची जोरदार चर्चा सुरु आहे. इंग्लंडमध्ये राहणारे अरबपती शिख उद्योगपती रुबेन सिंह सध्या जास्तच चर्चेत आहे. रुबेन सिंह यांच्याकडे एक नाही दोन नाही तर तब्बल ७ वेगवेगळ्या रंगांच्या रॉल्स रॉयस कार आहेत. रॉल्स रॉयस ही जगातील सर्वात महागडी कार आहे. रुबेन सिंह यांची जिद्दीची कहाणी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

रुबेन यांची कहाणी

रबेन सिंहला एका ब्रिटिश नागरिकाने वर्णद्वेशी वक्तव्य केले होते. एक वेळ अशी होती जेव्हा रुबेन सिंहला ब्रिटिश बिल गेट्स म्हटले जायचे. त्यांनी मिस अॅटिट्यूड हा कपड्याचा ब्रँड सुरु केला. एक काळी त्याचा व्यवसाय १० मिलियन पाऊंडपेक्षा अधिक मोठा होता. मात्र अचानक त्यांचे वाईट दिवस सुरु झाले आणि त्यांना १ पाऊंडमध्ये व्यवसाय विकावा लागला. रुबेल सिंह यांच्याकडे असणारी ऑल डे पा ही कंपनी सुध्दा निघून गेली. त्यावेळी त्यांना दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले होते.

जेवढ्या पगड्या तेवढ्या कार

या वेळीच एका ब्रिटीश उद्योगपतीने रुबेन यांची थट्टा केली. त्यांच्या पगडीकडे पाहून तुम्ही फक्त वेगवेगळ्या रंगांच्या पगड्या घालू शकता असे वक्तव्य केले. त्या ब्रिटिश उद्योगपतीचे बोलणे ऐकूण रुबेन यांच्या मनाला लागले त्यांना वाईट वाटले. त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी त्या ब्रिटीश उद्योगपतीला सांगितले की, जेवढ्या रंगाच्या पगड्या घालेल, तेवढ्याच रुंगाच्या रॉल्स रॉयस माझ्याकडे असतील.

तरुणांसाठी प्रेरणास्थान

वाईट वेळी देखील रुबेन यांनी हार मानली नाही. २०१५ मध्ये त्यांनी ऑल डे पा या कंपनीवर पुन्हा वर्चस्व मिळवले. त्यानंतर त्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल ७ रॉल्स रॉयस कार खरेदी केल्या. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेले रुबेन सिंह तरुणांसाठी चांगलच प्रेरणादायी ठरले आहे. रुबेन जिद्दी आणि इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा अबजोपती बनले.

First Published on: November 13, 2018 8:07 PM
Exit mobile version