Indian Corona Vaccine : भारताच्या Covaxin आणि Covishield ला ११० देशांची परवानगी, इतर देशातही मान्यतेसाठी प्रयत्न सुरु

Indian Corona Vaccine : भारताच्या Covaxin आणि Covishield ला ११० देशांची परवानगी, इतर देशातही मान्यतेसाठी प्रयत्न सुरु

Covishield आणि Covaxin लस आता खुल्या बाजारात विकण्यास DCGI ची परवानगी

Covaxin & Covishield Indian Corona Vaccine: जगभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्यातरी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे सर्वच देश लसीकरण मोहित वेगाने सुरु ठेवत सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करत आहे. यातच अनेक लस उत्पादक कंपन्यांकडून परदेशात लसींचा उत्पन्न पोहचण्यासाठी प्रयत्न सुरु  आहेत. अशातच जगभरातील तब्बल ११० देशांनी आता भारतीय बनावटीच्या Covaxin आणि Covishield ला परवानगी दिला आहे. भारत बायोटेक कंपनीमार्फत कोवॅक्सीन तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोव्हिशील्ड या लसीची निर्मिती होते. एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ११० देशांनी Covishield आणि Covaccine या कोरोनाविरोधी लसींना मान्यता दिली आहे.

इतर देशांसोबत चर्चा सुरु

भारतीय बनावटीच्या Covaxin आणि Covishield लसीला उर्वरित देशांमध्येही मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. ज्यामुळे शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटन अशा अनेक कारणांसाठी परदेशात प्रवास करणे सोपे होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र लवकरचं भारताच्या Covaxin आणि Covishield इतर देशांमध्येही मान्यता मिळू शकते.

भारतात आतापर्यंत सर्वाधिक नागरिकांना कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचे डोस देण्यात आले आहेत. यात या दोन्ही लसींना जागतिक आरोग्यं संघटनेनेही लसींच्या आपत्कालीन वापराच्या यादीत स्थान दिले आहे. त्यामुळे या लसींचे दोन डोस घेतलेल्या लोकांना या दोन कोरोना लसींना मान्यता नसलेल्या देशांमध्येही प्रवास करणे शक्य होते. कारण, कोरोनाची परिस्थिती पाहता बहुतेक देशांनी परदेशी प्रवाशांना त्यांची लस घेतलेल्या प्रमाणपत्राची माहिती दाखवणे बंधनकारक केले आहे.

दरम्यान अनेक देशांनी राष्ट्रीय मान्यताप्राप्त किंवा WHO मान्यताप्राप्त लसींच्या लसीकरण प्रमाणपत्राला परस्पर मान्यता देण्याबाबत भारतासोबत करार आहेत. परंतु अद्याप अनेक देशांनी भारतासोबत अशाप्रकारचा कोणताही करार केला नाही. त्यामुळे अशा देशांमध्येही भारतीय लसींना मान्यता मिळावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

भारतात किती नागरिकांचे लसीकरण पूर्ण?

आत्तापर्यंत भारतात ११५ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाविरोधी लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी ७६.१९ कोटी लोकांना पहिला डोस आणि ३९.०८ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भारतात १६ जानेवारीपासून कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.


 

First Published on: November 19, 2021 8:44 AM
Exit mobile version