भारताची अर्थव्यवस्था घसरली; अमेरिका पुन्हा प्रथम

भारताची अर्थव्यवस्था घसरली; अमेरिका पुन्हा प्रथम

भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरली आहे. जागतिक बॅंकेने जीडीपीच्या पार्श्वभूमीवर २०१८ सालाची रॅंकिंग घोषित केली आहे. या रॅंकिंगमध्ये भारताचा नंबर सातव्या क्रमांकावर गेला आहे. गेल्यावर्षी भारताचा या यादीत पाचव्या क्रमांकाचे स्थान होते. मात्र, यावेळी इग्लंड आणि फ्रान्सने भारताला मागे टाकले आहे. इंग्लंड आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. तर अमेरिकेची अर्थव्यवस्था नेहमीप्रमाणे प्रथम क्रमांकावर आहे.

गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी विकासदर

जागतिक बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार भारताचा सध्याचा म्हणजेच २०१८-१९ चा विकासदर हा ६.८ टक्के इतका आहे. मात्र गेल्या पाचवर्षात ७.५ टक्के विकासदर राहिलेला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी विकासदर हा यावर्षी झाल्याचे म्हटले जात आहे.

First Published on: August 2, 2019 6:18 PM
Exit mobile version