भारतीयांमध्ये आहे कोरोनोशी लढण्याची ताकद, शरीरात सापडला दुर्मिळ RNA

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असतानाच भारतीयांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. यात इतर देशातील नागरिकांच्या तुलनेत कोरोनाशी लढण्याची सर्वाधिक ताकद ही भारतीयांमध्ये असल्याचा दावा दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटीक इंजिनियरिंग अँड बायो टेक्नोलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. भारतीय व्यक्तींच्या शरीरात विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ असा मायक्रो RNA असतो. जो वंशगत असून तो भारतीय व्यक्ती सोडल्या तर अन्य देशातील व्यक्तींमध्ये सापडत नाही. यात कोरोनाची तीव्रता कमी करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे कोरोनो व्हायरसही आरएनए व्हायरस असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

या आरएनएला (रायबो न्यूक्लिक अॅसिड) असेही म्हटले जाते. सध्या इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटीक इंजिनियरिंग अँड बायो टेक्नोलॉजीचे संशोधक कोरोना सार्स-टूवर संशोधन करत आहेत. डॉक्टर दिनेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका पथकाने पाच देशातील कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात केला. यात भारत, इटली, यूएसए, नेपाळ आणि चीनमधील वुहान शहरातील रुग्णांचा समावेश होता. यात वुहानमधील दोन रुग्णांचा वैद्किय इतिहास तपासण्यात आला. अशाच प्रकारे इतर रुग्णांचा वैद्यकिय इतिहासही तपासण्यात आला. पण भारतीय रुग्ण वगळता मायक्रो आरएनए (एचएसए-एमआयआर-27-बी) हा इतर कोणत्याही रुग्णाच्या शरीरात सापडला नाही.

तसेच यावेळी कोरोनाच्या संसर्गाची तीव्रताही अभ्यासली गेली. यात व्हायरसवरील प्रोटीनचे विशेष आवरण मायक्रो आरएएनच्या संपर्कात येताच क्षीण होते. यामुळे कोरोनाचा संसर्ग व्यक्तीस कमी प्रमाणात होतो. पण हाच व्हायरस इतर देशांच्या व्यक्तींच्या शरीरात आक्रमकपणे प्रवेश करत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनाही कोरोना प्रभावित देशांच्या रुग्णांचा डेटा तयार करत आहे. ज्यांच्यात हा एचएसए-एमआयआर-27-बी नावाचा मायक्रो आरएनए नाहीये. त्यावरून हा मायक्रो आरएनए ज्या व्यक्तींच्या शरीरात आहे त्यांच्यात कोरोनाशी लढण्याची ताकद आहे यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल असे या संस्थेच्या डॉक्टर शीतल वर्मा यांनी सांगितले आहे.

First Published on: March 28, 2020 8:46 PM
Exit mobile version