भारतीय नौदलाने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची घेतली यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची घेतली यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाने काल, शनिवारी विस्तारित पल्ल्याच्या, जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस या जहाजावरून सोडण्यात येणाऱ्या स्वनातीत क्षेपणास्त्राच्या विस्तारित अंतरावर लक्ष्यभेद करण्यातील अचूकतेची यशस्वी चाचणी घेतली. आयएनएस चेन्नई या स्टेल्थ विनाशिकेवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. हल्ल्यासाठी विस्तारित पल्ला पार करत आणि अत्यंत जटील प्रयुक्त्या अवलंबत या क्षेपणास्त्राने कमालीच्या अचूकतेने लक्ष्यभेद केला.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि आयएनएस चेन्नई हे लढाऊ जहाज या दोघांचीही निर्मिती स्वदेशी बनावटीची आहे आणि त्यांच्या उभारणीत भारतीय क्षेपणास्त्र विषयक तसेच जहाज बांधणी विषयक कौशल्य ठळकपणे उठून दिसत आहे. त्यांच्या स्वदेशी निर्मितीमुळे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन्ही उपक्रमांमध्ये भारतीय नौदलाने दिलेले योगदान अधिक उत्तमपणे दिसून येत आहे.

कालच्या चाचणीत मिळालेल्या यशामुळे, जेव्हा आणि जिथे गरज असेल तिथे भारतीय नौदलाची आणखी खोलवर जाऊन लक्ष्याचा भेद करण्याची तसेच समुद्रापासून लांब अंतरावरील जमिनीवर होणाऱ्या कारवायांवर प्रभाव टाकण्याची क्षमता प्रस्थापित झाली आहे.


हेही वाचा – BSF Soldiers Firing : बीएसएफच्या मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार, ५ जवानांचा मृत्यू तर १ जखमी


 

First Published on: March 6, 2022 4:48 PM
Exit mobile version