अमेरिकेत ६०० भारतीय विद्यार्थ्यांना अटक

अमेरिकेत ६०० भारतीय  विद्यार्थ्यांना अटक

Police arrested

इमिग्रेशनचे नियम मोडणार्‍या अमेरिकेतील ६०० भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमेरिकन इमिग्रेशन अ‍ॅण्ड कस्टम इन्फोर्समेंट एजन्सीने ही कारवाई केली आहे. या विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.अमेरिकेत इमिग्रेशनचे नियम दिवसेंदिवस अधिकच कठोर करण्यात येत आहेत. तसेच हे नियम मोडून देशात रहाणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांवर कारवाईचे धोरण अमेरिकेने अवलंबिले आहे.

त्याअंतर्गत योग्य त्या परवानगीशिवाय देशात राहणार्‍या विविध देशातील विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात भारतातील ६०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. फ्रेमिंगचन हिल्स भागात बनावट विद्यापीठाची निर्मिती करून परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या सर्व आरोपांतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक तांत्रिक मुद्दे असल्याने ही गुंतागुंत सोडवण्यासाठी काही कालावधी जावा लागेल असे सांगण्यात येत आहे. परदेशात असणार्‍या भारतीय दूतावासामार्फत या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. अमेरिकन तेलगु असोसिएशनशी निगडित असलेले विद्यार्थी आणि त्यांचे मित्रमंडळी यांच्याकडून ही गोष्ट समजली. यापुढे नेमके काय करायचे यासाठी अमेरिकेतील काही भारतीय संघटना आणि तेलगु असोसिएशन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत आहेत.

First Published on: February 1, 2019 5:30 AM
Exit mobile version